ऑनलाईन पार्सलच्या बॉक्समध्ये निघाला भलामोठा साप; व्हिडिओ वायरल

सध्या दररोज सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ (video) व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील अनेक व्हिडिओंवर विश्वास ठेवणे आपल्याला अशक्य होते. बऱ्याच वेळा हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या संवेदना हरवतात. असाच एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच कोणाचीही किंचाळी निघेल.

आजकाल ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. अशातच एक भयानक घटना घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चक्क ऑनलाइन शॉपिंगच्या पार्सलमधून एक साप निघाला आहे. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. बंगळुरू मधील एका जोडप्याने ऑनलाइन साईट वरून एक वस्तू मागवली होती. त्या पाकिटातून जिवंत साप बाहेर आला आहे. हे पाहताच जोडप्याला मोठा धक्काच बसला. या जोडप्याने आधीच साप पाहिला म्हणून चांगले झाले नाहीतर काही तरी अनुचित प्रकार घडू शकला असता. हा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लाल रंगाच्या बादलीमध्ये ऑनलाइन मागवलेले प्रोडक्ट ठेवलेले पाहायला मिळत आहे. पार्सल उघडताच त्या जोडप्याला साप दिसला. हा साप पार्सला लावण्यात आलेल्या काळ्या टेपमध्ये अडकला होता. साप थरथरत बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

T-20 World Cup दरम्यान आयसीसीकडून हार्दिक पंड्यासाठी गुड न्यूज..

राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता: नाना पटोले

गेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू…