उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची एकेरी भाषेत टीका; म्हणाले…

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन (anniversary) दिन आहे. यानिमित्ताने दोन्ही शिवसेना मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. यानिमित्ताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ष्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एनएससीआय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना बरोबर घेत निवडणुकीत मते मागितली. उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा दुकान बंद करणे असे म्हटले होते. त्याच काँग्रेसच्या पंजावर उद्धव ठाकरे मतदान करून आले आहेत. त्यांना शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.”

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले (anniversary). मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर 40 आमदार घेत भाजपशी युती केली. तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची याबाबत लढाई सुरू आहे. यामध्ये न्यायालयीन लढाई सुरू असली तरी दोन्ही पक्षातील नेते सतत एकमेकांवर टीका करत आपणच कसे बरोबर आहोत हे सांगत असतात.

नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत 9 जगांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून 7 जागा जिंकल्या. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जगांवर दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा :

ऑनलाईन पार्सलच्या बॉक्समध्ये निघाला भलामोठा साप; व्हिडिओ वायरल

T-20 World Cup दरम्यान आयसीसीकडून हार्दिक पंड्यासाठी गुड न्यूज..

राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता: नाना पटोले