इयत्ता दहावी आणि बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे (school). महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात लागणार आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे. मंडळाने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत. कोणत्या आठवड्यात निकाल जाहिर होणार हे सांगण्यात आलंय.
मेच्या चाैथ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल (school). म्हणजेच काय तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख आता जाहिर करण्यात आलीये. अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला mahahsscboard.in येथे मिळतील. mahresult.nic.in आणि msbshse.co.in या साईटवर आपण दहावी आणि बारावीचा निकाल आरामात बघू शकता.
हेही वाचा :
सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारनने मारली गुजरातच्या या खेळाडूला मिठी
संजयकाकांची कदमांवर सडकून टीका, मित्र विशाल पाटलांनी ढाल बनून जशास तसं दिलं प्रत्युत्तर
कोल्हापूर शेतकरी संघात चाललंय काय? संचालकांकडून मर्जीतल्या आधिकाऱ्यांची अर्जी