ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात

कथित मद्यघोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(news) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आज (१, एप्रिल) अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीची मुदत संपत आहे. अशातच केजरीवाल यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हीन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, कथित मद्य घोटाळा प्रकरणात(news) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडी कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली असून कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कोणताही दिलासा न देता त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मागच्या सुनावणी वेळी केजरीवाल यांनी स्वतः युक्तिवाद करत आपल्याला या प्रकरणात कसे अडकवले आहे हे कोर्टाला सांगितले होते. कोर्टाने यासंबंधी ईडीला नोटीस पाठवत उत्तर सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आज जेल अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये रवानगी करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पाच नंबर जेलची स्वच्छता करण्यात आली असून केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये हलवल्यास त्यांना पाच नंबरमध्ये ठेवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत

मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष