ठग्स ऑफ पॉलिटिशियन इन महाराष्ट्र

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि अमीर खान(politician website) यांचा “ठग्स ऑफ हिंदुस्तान” हा चित्रपट रजत पटावर प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर तो सपशेल आपटला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात खास वेळ काढून गेलेल्या रसिकांचीच या ठग्स ने फसवणूक केली होती. “ठग्स ऑफ पॉलिटिशियन” या नावाचा चित्रपट बनवून तो सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रदर्शित केला असता तर तो तुफान गर्दीत चालला असता. कारण रसिकांना तो वास्तवदर्शी वाटला असता. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात “अशी ही बनवाबनवी”या चित्रपटाला लाजवेल इतकी फसवणूक सुरू आहे, ठकास भेटे महाठक अशी एकूण स्थिती आहे.

नवी दिल्लीत इंडिया आघाडीची(politician website) सभा झाली, या सभेला “ठग का मेला” अर्थात ठगांचा मेळावा अशी टीका भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. तर नरेंद्र मोदी सिनेमा, नितीन गडकरी यांचा हायवे मॅन सिनेमा, सावरकर चित्रपट, गोडसे वरील चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. आता भारतीय जनता पक्षाने, देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट किमान गांधी विचारांसाठी पहावा असे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी उपहासात्मक आवाहन केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत केलेल्या टीकेला जोरदार उत्तर देताना भारतीय जनता पक्षाने आमच्याकडे अनेक विषयांवर स्क्रिप्ट तयार आहेत. शंभर कोटी वसुली फाईल, वाझे की लादेन फाईल, खिचडी फाइल्स, कोविड बॅग फाइल्स अशा अनेक स्क्रिप्ट तयार असून त्यावर चित्रपट काढता येतील असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चित्रपट आणि काही स्क्रिप्ट यावर चर्चा सुरू आहे. या निमित्ताने राजकारण्यांच्या कडून, मतदारांची, सर्वसामान्य जनतेची फसवणूक सुरू आहे. बनवेगिरी सुरू आहे. आणि त्याला कोणताही एक राजकीय पक्ष अपवाद नाही.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. तेव्हा आम्हाला मतदारांनी विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे, असे शरद पवार सांगत होते. आणि त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्ववादी विचारामुळे हिंदुत्ववादी मतदारांनी मतदान केले होते. पण त्यांनी हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला होता. तरी इकडे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विचारांशी अजिबात सहमत नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार यांच्या गटाशी सलगी केली आहे. आम्ही आमचा विचार वाऱ्यावर सोडून भाजपशी हात मिळवणी केलेली नाही असे सांगणारे अजितदादा पवार सध्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा यासाठी प्रचार करताना दिसत आहेत.

इसवी सन 2014 च्या निवडणुकीतही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती तेव्हा शरद पवार यांनी त्यांच्या लेखी जातीयवादी असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 च्या पहाटेच्या शपथविधीला त्यांचा आशीर्वाद होता हे आता लपून राहिलेले नाही.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पक्ष हा नालायकांचा पक्ष असे कालपरवापर्यंत वाटत होते. आता तेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहू लागले आहेत. शरद पवार हे विश्वासघातकी राजकारणी आहेत असे म्हणणारे आंबेडकर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकांना वंचितला का आमंत्रित केले गेले नाही असा सवाल विचारू लागले आहेत.

एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात राजकारण्यांच्या कडून आणि विविध पक्षांच्या नेत्यांच्याकडून सर्वसामान्य मतदारांची फसवणूक सुरू आहे. मतदाराला फसवून किंवा त्याला बनवून अनेक राजकीय पक्षांनी वैचारिक भिन्नता असलेल्या राजकीय पक्षांशी युती केली आहे. “ठग्स ऑफ पॉलिटिशियन इन महाराष्ट्रा”अशा शब्दात त्याचे वर्णन करता येईल.

हेही वाचा :

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष

मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग

ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात