टी 20 वर्ल्डकपमध्ये सध्या सुपर 8 चे सामने सुरु आहेत. यावेळी टीम(team) इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी झाला होता. तर आता भारताचा दुसरा सामना बांगलादेशाची होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता हा सामना रंगणार आहे. लुसियामधील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरूद्ध बांगलादेश आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम(team) इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या टीम इंडियाचा ओपनर विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. मात्र, किंग कोहलीवर कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटचा पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करू शकतात. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र जसप्रीत बुमराहला विश्रांती देणे कठीण आहे, कारण उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित आपल्या मजबूत टीमला मैदानात उतरवणार आहे. अशा स्थितीत शिवम दुबेलाही प्लेईंग 11 आणखी एक संधी मिळू शकते.
मिडल ऑर्डरमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या मॅच फिनिशर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गोलंदाजीमध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा स्पिनर्सवर विश्वास दाखवणार आहे. यामध्ये अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना टीममध्ये संधी मिळणार आहे. गरज भासल्यास अक्षर आणि जडेजाही फलंदाजीने योगदान देऊ शकतात. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराजला पुन्हा टीममध्ये जागा मिळणं कठीण आहे. याशिवाय वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
कशी असेल बांगलादेशाविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा :
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात भरती
विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत दोन्ही खासदारांकडून अपेक्षा
कोल्हापुर पोलिस ऍक्शन मोडवर; Reels चा नाद पडेल भारी, करावी लागेल पाेलिस ठाण्याची वारी…