सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा

सकाळच्या नाश्त्यात(breakfast) बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या वेळी आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहाने जातो. शिवाय शरीरात ऊर्जा निर्माण होते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे मटार उपलब्ध असतात.

हिरवे मटार आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. मटारपासून मटार पुलाव, मटार भाजी, कटलेट, भजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला मटारचा वापर करून ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ढोकळा हा पदार्थ खायला खूप आवडतो. ढोकळा(breakfast) खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मटार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • मटार
  • मीठ
  • बेसन
  • रवा
  • दही
  • हिरवी मिरची
  • आलं
  • फ्रूट सॉल्ट
  • लाल मिरची
  • मोहरी
  • हिंग
  • पांढरे तीळ

कृती:

  • मटार ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, रवा, बेसन, चवीनुसार मीठ आणि दही मिक्स करून घ्या.
  • नंतर मिक्सरच्या भांड्यात मटार, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • पेस्ट तयार करून झाल्यानंतर रव्याच्या मिश्रणात मिक्स करा. त्यानंतर डब्यात तेल लावून त्यात तयार करून घेतलेले सारण ओतून सेट करून घ्या.
  • त्यानंतर टोपामध्ये किंवा कुकरच्या भांड्यात ढोकळा वाफवण्यासाठी ठेवा. 15 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी गरम करा.
  • ढोकळा थंड झाल्यानंतर त्यावर तयार केलेली फोडणी ओतून तुकडे करून घ्या. वरून पांढरे तीळ टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटार ढोकळा.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ३१ जानेवारीपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा २ हजार मिळणार नाहीत

एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना समोरुन येणाऱ्या ट्रेनने उडवलं, 8 जण ठार

शर्टाचा खिसा डाव्याबाजूलाच का असतो? कारण अतिशय Interesting