हातकणंगलेत माने-पाटलांचं ‘या’ उमेदवारांनी वाढवलं टेन्शन; ‘सेम टू सेम’ नावाने घोळ होणार…

अडाणी मतदारांची दिशाभूल करून मत विभाजनाचा(tension) फटका विरोधी उमेदवाराचा करण्याचा बेत काही जणांचा असतो. त्यामुळे नामी शक्कल लढवण्याची परंपरा हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी नवीन नाही. मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी नावाचे दोन उमेदवार उभा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जवळपास आठ हजार मतांचा फटका बसला होता. आता तीच शक्कल हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राबवली जाते की काय, असा सवाल उपस्थित होतोय. या मतदारसंघांमध्ये दोन धैर्यशील माने आणि दोन सत्यजित पाटील नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

उमेदवाराच्या नावाचे सेम नावाचे साम्य दाखवून फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या(tension) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या नाव साधर्म्याशी जुळणाऱ्या धैर्यशील संभाजी माने या अपक्ष उमेदवाराने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज केला आहे. हे धैर्यशील माने हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील रहिवासी आहेत.

बारावी उत्तीर्ण असलेले हे माने स्थानिक राजकारणात जनसुराज्य पक्षाचे कामात सक्रिय आहेत. शिवाय त्यांचा व्यवसाय शेती असल्याचेही सांगितले जाते. मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित बाबासो पाटील यांच्या नावाशी जुळते असलेल्या पारगाव येथील सत्यजित बाळासो पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

अनेकदा काही जण नाव वाचूनच मतदान करत असतात. त्याचा फायदा जिंकून येणाऱ्या उमेदवाराला होत असतो. काही प्रमाणात मत विभाजनाचा फटकादेखील बसण्याची शक्यता असते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसारखी मिळती जुळती नावे असणारे दोन अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्याचा मुख्य उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर त्यांच्याच नावाचे जुळती असलेल्या राजू मुजिकराव शेट्टी यांना मुंबईतून शोधून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. हे राजू शेट्टी बहुजन महा पार्टीचे पदाधिकारी होते. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आठ हजार 100 इतकी मते पदरात पाडून घेतली होती.

हेही वाचा :

मंडलिकांनी काढला जुना विषय; ‘त्यांचा’ पराभव करण्यासाठी माझ्यासोबत आले…

चंद्रकांतदादांनी भर सभेत शिरोळमधील माधवराव घाटगेंना दिली आमदारकीची ऑफर, पण…

काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही; मिलिंद देवरा यांचं टीकास्त्र