कोल्हापूर प्रतिनिधी : सार्वजनिक गणेशोत्सव(pollution) साजरा करीत असताना काही मंडळे पोलीस प्रशासानच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदुषण करणारे साऊंड सिस्टीम लावत असतात. २०२३ साली कोल्हापूर जिल्हयातील ५३६ मंडळांनी नियम मोडल्याबदद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ३९७ मंडळांवरील खटले न्यायालयात सादर झाले आहेत. उर्वरीत १३९ खटल्यांचे कामकाज अंतिम टप्पयात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
ज्या मंडळांवर खटले दाखल(pollution) आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ व १९ तसेच ध्वनिप्रदूषण नियम ५ व ६ अन्वये न्यायालयात दोष सिध्द झाल्यास त्या मंडळास पाच लाख रुपये दंड तसेच पाच वर्षे शिक्षा होऊ शकते. त्यांना अशा गंभीर स्वरुपाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
कोल्हापूरचा गणेशोत्सव संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण व जल्लोषात असतो. कर्णकर्कश आवाजाचे साऊंड सिस्टीम लावण्यावर पोलीसांनी व जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले तरी तरुण मंडळांचे कार्यकर्ते ऐकत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात साऊंड सिस्टीमचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ मंडळांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. यातील ३९७ खटले न्यायालयात सादर झाले आहेत. तर उर्वरीत खटले लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहेत.
गतवर्षीच्या गणेशोत्सवात विसर्जन तसेच आगमन मिरवणूकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक मंडळाचे नमूने पोलीसांनी घेतले होते. क्षमतेपेक्षा अधिक आवाजाचे ध्वनीक्षेपक लावून कर्णकर्कश व गोंगाट निर्माण करणाऱ्या मंडळांवर ध्वनीप्रदुषण कायदद्यानुसार कारवाई केली होती.
विभाग एकूण खटले सादर केलेले खटले चौकशी सुरु असलेले
शहर ११७ ११६ ०१
करवीर १४३ १४३ ००
इचलकरंजी ४६ ४६ ००
जयसिंगपूर ६७ ६७ ००
गडहिग्लज ७३ २२ ५१
शाहूवाडी ९० ०३ ८७
एकूण ५३६ ३९७ १३९
हेही वाचा :
भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत ‘या’ नेत्याची थोरल्या पवारांना साथ
पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं… उचललं हे मोठं पाऊल
कोल्हापुरातील मटका किंग विजय पाटील यांच्यासह १२ जण हद्दपार