कोल्हापुरातील मटका किंग विजय पाटील यांच्यासह १२ जण हद्दपार

कोल्हापूर प्रतिनिधी : मटका किंग विजय लहू पाटील याच्यासह मटका(satta matka) व्यवसायाशी संबंधीत त्याच्या गॅँगमधील १२ जणांना पोलीसांनी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यतून हद्दपार केले आहे. पोलीसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांनी मान्यता दिली. जिल्ह्यतील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

मटका(satta matka) व्यवसायाच्या माध्यमातून आज हजारो तरुण या अवैध व्यवसायात आपले आयुष्य बरबाद करीत आहेत. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मटका हदद्दपार व्हावा अशी मागणी नागरीकातून केली जात होती. कोल्हापुरातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी या व्यवसायातील प्रमुखांना जिल्ह्यातून हदद्दपार करण्यासाठी प्लॅन आखला होता.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजीवकुमार झेंडे यांनी मटका व्यवसायातील मात्तबरांचे प्रस्ताव तयार करून हदद्दपारीसाठी अधीक्षक कार्यालयात पाठवले होते. याबाबतच नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली होती.

या सुनावणी दरम्यान ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले होते. नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांना त्याची बाजू मांडण्यास पुरेशी संधी व अवधी देण्यात आला होता. मटका किंंग लहू पाटील याने निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून अवैध व्यवसायाला परिणाम दिलेला असल्यामुळे टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे तरुण वर्ग वाममार्गाला लागला आहे. समाजात गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे, त्यामुळे सामाजिक स्वास्थास बाधा निर्माण होत असल्याचे दिसून येते हे पोलीसांच्या लक्षात आले.

हदद्दपार केलेल्यांमध्ये मटका किंग विजय लहू पाटील (रा.देवकर पाणंद), राहुल बाळू गायकवाड (रा.यादवनगर), अजित सर्जेराव इंगळे (रा. टिंबर मार्केट), संदीप बाळासाहेब राऊत (रा. शिवाजीपेठ), प्रकाश नागनाथ गाडीवडर (रा.सानेगुरुजी वसाहत), दिलीप जगन्नाथ अधिकारी (रा.संभाजीनगर),

आनंदा श्रीपती दुकांडे (रा.वेताळमाळ तालीमजवळ शिवाजी पेठ), चैतन्य विलास बंडगर (रा. क्रेशर चौक), विष्णू पांडुरंग आंग्रे (रा.काटे भोगाव, पन्हाळा), निरंजन वसंत ढोबळे (रा. मंगळवारपेठ), कुलदीप बाजीराव लांबोरे (रा. मंगळवार पेठ), नंदकुमार पंडीतराव चोडणकर (रा.गंगावेश) यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत ‘या’ नेत्याची थोरल्या पवारांना साथ

पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं… उचललं हे मोठं पाऊल

कोल्हापुरात ‘राजकीय’ शर्यत! संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज