निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय; कांद्यावरील निर्यात बंदी हटवली

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्र सरकारने(export business) एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर १ मॅट्रिक टन कांद्यासाठी जवळास ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून केंद्र सरकारने(export business) कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त सोडलं होतं. मोदी सरकारला शेतकऱ्यांची अजिबात चिंता नसून हे फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचं सरकार होतं, असं म्हणत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.

दरम्यान, राज्यात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या या रोषाचा फटका भाजपला बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मॅट्रिक टन कांद्यासाठी ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अगदी आठवड्याभरापूर्वी गुजरातमधील २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली होती. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान, कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. निर्यात बंदी उठली असे वाटत असले, तरी निर्यात शुल्क तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (04-05-2024): horoscope signs

केजरीवालांना अंतरिम जामीन? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट संकेत

गोलमाल…! अदानींच्या सहा कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस