गोलमाल…! अदानींच्या सहा कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जगातील सर्वात मोठा घोटाळा ठरलेली इलेक्टोरल बॉण्ड योजनाच सुप्रीम कोर्टाने असंविधानिक ठरवली. त्यानंतर मोदी सरकारचे (govt)अनेक घोटाळे बाहेर आले. ईडी, सीबीआय, आयटी कारवाईच्या आडून अनेक कंपन्यांकडून भाजपाने मोठमोठय़ा देणग्या पदरात पाडून घेतल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अदानी समूहाचा गोलमाल उघड झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सेबी अर्थात सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने अदानी समूहाच्या तब्बल सहा कंपन्यांना आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता आणि कंपन्या लिस्टेड करण्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघ केल्या प्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कंपनीने मार्चअखेर तिमाही आणि सरलेल्या आर्थिक वर्षाची आर्थिक कामगिरी अहवालाद्वारे जाहीर केली होती, त्या वेळी सहा कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याची बाब अहवालातून उघड झाली.(govt)

सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होता

अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सेबीला चौकशी करण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही, असा निकाल दिला होता. सेबीने 24पैकी 22 प्रकरणांची चौकशी करण्यात आली असून उर्वरित दोन प्रकरणांचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल, असे जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाला सांगितले होते.

इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास जेपीसी नेमणार

अदानींच्या महाघोटाळ्याला अनेक पदर आहेत, असेही काँग्रेसने म्हटले आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्रांना मालमत्ता विकण्यासाठी भाग पाडणे असो किंवा बांगलादेश, श्रीलंका आणि अन्य देशांमध्ये अदानीला पंत्राट मिळवून देण्यासाठी मोदी सरकारकडून राजकीय साधनसामुग्रीचा वापर असो, या सर्वांची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्यासाठी इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर 2024मध्ये संयुक्त संसदीय समिती नेमणार असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

अदानी, भाजपाच्या खोटय़ा दाव्यांची पोलखोल- काँग्रेस

सेबीने अदानींच्या तब्बल सहा कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यामुळे अदानी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांच्या खोटय़ा आणि पोकळ दाव्यांची पोलखोल झाली आहे, असा सणसणीत टोला काँग्रेसने लगावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या तज्ञ समितीने अदानींना क्लीन चिट दिल्याचा दावा केला जात होता. अदानीचे निकटवर्तीय चुंग लिंग आणि नासीर अली, शाबान अहली यांनी अदानी समूहात मोठी पार्टनरशिप मिळवण्यासाठी बेहिशेबी निधीचा वापर केला होता, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे. हीच लोपं अदानीच्या 8 ते 14 टक्के शेअर्सवर नियंत्रण ठेवत होते, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. अदानी समूहाकडे तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा बेहिशेबी पैसा आला. याचीही चौकशी व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले असून आता पंपनीला आपल्या सर्व संशयास्पद व्यवहारांचा हिशेब सेबीला द्यावा लागेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा :

 मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्..

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल