चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आले आमने-सामने

सांगली लाेकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीसह(face) अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज (शुक्रवार) दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचार निमित्त एकाच ठिकाणी आले. त्याची चर्चा शहरात अवघ्या काही क्षणात रंगली.

या दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस(face) देखील केली. शहरातील बापट मळा या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची ही भेट झाली. त्यानंतर दाेघे नियाेजित कार्यक्रमांसाठी निघून गेले.

दरम्यान विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील व समर्थकांविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनूसार चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात प्रचार फेरी काढली होती. ही फेरी 24 एप्रिलला सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 पर्यंत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटींसाठी हाेती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची पदयात्रा हाेती. त्यास परवानगी घेण्यात आली नव्हती. दरम्यान चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या 2 ते 3 समर्थकांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा…, विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?

शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का, शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी