मराठा विरोधकांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे कडाडले

मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला(opposition)उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केलं आहे. निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते.

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर(opposition) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आज परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान असल्याने जरांगे हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गोरी गंधारी या गावी आले होते. लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

माध्यमांसोबत संवाद साधताना जरांगे म्हणाले, “मी मराठा मतदारांना सांगितलं होतं की कुणालाही मतदान करा. कारण समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. सगेसोयरे अध्यादेशाच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मराठा समाजाने सहकार्य करायला हवं”.

“जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“६ जूनच्या आत आरक्षण दिलं नाही तर आम्ही देणारे बनू विधानसभेच्या मैदानात मी सुद्धा असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते सारखेच आहेत असं माझा म्हणण्याचा अर्थ होता. पण या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला”, असं देखील जरांगेनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत.निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केलं आहे.

हेही वाचा :

चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आले आमने-सामने

शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का, शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी

मोठी बातमी! तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?