लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन चेतन नरके(supporting) यांनी काय मिळवले, अशी चर्चा माझे काही हितचिंतक करत आहेत. पण, अडीच वर्षांत मी जे काही मिळवले, ते आज माझ्या समोर आहे. माझी चिंता करण्यापेक्षा आपला गट सांभाळा, आडवा पाय माराल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. मलाही मग ‘कुंभी’ सह इतर संस्थेत लक्ष घालावे लागेल, असा इशाराही डॉ. चेतन नरके यांनी दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती(supporting) यांना मंगळवारी डॉ. नरके यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या पाठिंबा सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते.
डॉ. चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, थांबावे लागले म्हणून नाराज न होता, शाहू- फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. व्यासपीठावरील उपस्थिती पाहता, भविष्यातील नवीन समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे सूचक वक्तव्य करत चेतन नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देऊन येथेच त्यांच्या विजयाची पायाभरणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाहू छत्रपती म्हणाले,डॉ. चेतन नरके यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांचे विचार एकच असून, शेतकरी केंद्रबिंदू मानून आगामी काळात काम करणार आहे. मी जरी जग फिरलो असलो तरी डॉ. चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन असून, तेच घेऊन मी कोल्हापूरचा विकास करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दिली.
डॉ. चेतन नरके यांनी गेली अडीच वर्षे कोल्हापूर मतदारसंघातून तयारी केली होती. गाव आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन संपर्क मोहीम राबवली होती. त्यांनी उमेदवारीसाठीही प्रयत्न केले, पण काँग्रेसचा आग्रह शाहू छत्रपतींसाठी राहिल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांची अडीच वर्षांची मेहनत्, कष्ट हा सतेज पाटील वाया जाऊ देणार नाही, एवढी ग्वाही या मेळाव्याच्या निमित्ताने देतो, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा :
हातकणंगले मतदारसंघांत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!
प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले