बर्थ डे बॉय रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंडय़ाच्या निराशाजनक खेळामुळे मुंबई इंडियन्सला(mumbai indians) लखनऊतही पराभवालाच सामोरे जावे लागले. आजची लढत मुंबईसाठी अस्तित्वाची होती.
पण या सामन्यात लखनऊने 4 विकेट्सनी विजय मिळवल्यामुळे मुंबईसाठी(mumbai indians) आयपीएलच्या प्ले ऑफचा विषय संपला आहे. सातव्या पराभवामुळे मुंबईने आपले तळाचे नववे स्थान कायम राखले आहे तर लखनऊने तिसऱया स्थानावर उडी घेतली आहे.
मुंबईला आयपीएलला साजेशी सलामी देता आली नाही. रोहित शर्मा सलग तिसऱया सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर मुंबईच्या डावाची सुरू झालेली घसरगुंडी कुणीच थांबवू शकला नाही. 27 धावांत मुंबईचे चार फलंदाज बाद करून लखनऊने सामन्यावर पकड घेतली. त्यानंतर इशान किशन आणि नेहाल वढेराने मुंबईला सावरले, पण 14 षटकांत केवळ 80 धावा झाल्या होत्या. मग टीम डेव्हिडने 18 चेंडूंत 35 धावा ठोकत मुंबईला 144 पर्यंत नेले. 145 धावांचा पाठलाग करताना लखनऊला पहिल्याच षटकांत धक्का बसला.
मात्र मार्कस स्टॉयनिसने 62 धावांची तडाखेबंद खेळी करत लखनऊला विजयासमीप नेले. स्टॉयनिस बाद होताच लखनऊच्या डावाला दोन हादरे बसले. तरीही निकोलस पूरनने 14 धावांची खेळी करत लखनऊला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. स्टॉयनिस या विजयाचा शिल्पकार ठरला.
हेही वाचा :
दारू पिऊन लिव्हर डॅमेज झाल्यास टेन्शन घेऊ नका, डॉ सरीनने घरगुती उपाय
भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला