छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा(political articles) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

यावेळी त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (political articles) आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी आभारी आहे.’ असे सांगितले. नाशिक मतदारसंघात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी मनापासून आभार असल्याचं देखील त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ‘नाशिक लोकसभेबाबत होळीच्या दिवशी अजित पवारांनी मला बोलावून घेतलं. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. नाशिकसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचे नाव सांगितलं होतं. पण अमित शहा यांनीच छगन भुजबळ यांचे नाव घेतलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे खासदार असल्याचे सांगितलं. पण अमित शहांनी नाशिकसाठी भुजबळच उमेदवार असतील असंचे सांगितलं होतं.’

छगन भुजबळ यांनी यावेळी नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ताबडतोब जाहीर करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘अजित पवारांशी बोलून झाल्यावर मी नाशिकमध्ये जाऊन आढावा घेतला आणि कामाला लागलो. आता जागा आणि उमेदवार जाहीर करण्याबाबत उशिर होत आहे. दिल्लीतील बैठकीबाबत मी शहानिशा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे चर्चेनुसार जागा जाहीर व्हायला हवी होती.

आता ३ आठवडे पूर्ण झालेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण जागा लढवणार, कोण उमेदवार हे ताबडतोब जाहीर करावे. नाहीतर अडचण निर्माण होईल. कारण समोरचा पक्ष जोरदार कमाला लागला आहे.’

तसंच, ‘जेवढा उशीर होईल तेवढा नाशिकच्या जागेचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला त्यासाठी त्यांचा आभारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला गेलो. पुढे काही जणांनी माझा वेळ मागितला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी काम करणार आहे.’ असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून महायुतीकडून हेमंत गोडसे निवडणूक लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!

मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका; मत विभाजनानं कोणाचा होणार ‘गेम’?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले