भारतातील निवडणुकांमध्ये खोडा घालण्यासाठी चीन करणार ‘एआय’चा वापर

भारतात या महिन्यापासूनच लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला(tamper) सुरुवात होणार आहे. यासाठीचा प्रचार सुरू असतानाच, एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या निवडणुकीदरम्यान चीन एआय टूल्सच्या मदतीने मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतं, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. ‘सेम टार्गेट्स न्यू प्लेबुक्स : इस्ट एशिया थ्रेट अ‍ॅक्टर्स एम्प्लॉय युनिक मेथड्स’ नावाच्या रिपोर्टमध्ये कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

चिनी हॅकर्स एआयच्या मदतीने निवडणुकांमध्ये खोडा(tamper) घालणार असा इशारा यापूर्वी देखील सरकारला मिळाला होता. आता मायक्रोसॉफ्टने देखील अशाच प्रकारची माहिती आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये यावर्षी निवडणुका होत आहेत. यामध्ये चीन आपल्या फायद्यासाठी एआय जनरेटेड कंटेंट आणि टूल्सचा वापर करु शकतो.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, चीनने यापूर्वी देखील असे प्रयत्न केले आहेत. चिनी हॅकर्स एआय टूल्सच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ तयार करू शकतात, तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट्सच्या मदतीने अपप्रचार करण्याचं कामही ते करू शकतात. प्रसिद्ध नेत्यांचा आवाज क्लोन करुन, बदनामीकारक कंटेंट तयार केला जाऊ शकतो. हा कंटेंट व्हायरल झाल्यास कोट्यवधी नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे, की चीनने तैवानमधील प्रेसिडेन्शिअल इलेक्शनवेळी या पद्धतीचा वापर केला होता. एखाद्या देशाने दुसऱ्या देशातील निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी एआयचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. जानेवारी 2024 मध्ये या निवडणुका पार पडल्या. या दरम्यान चीनने मीम्स, एआय व्हिडिओ आणि डीपफेक ऑडिओंच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला होता.

हेही वाचा :

बच्चन कुटुंबांच्या घरात घुमणार शहनाईचे सूर, नव्या नंदा करणार लग्न ?

महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप ? महायुतीला धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेणार

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका