दिल्ली सरकारमधी मंत्री आतिशी यांनी पत्रकार(maxwell leadership) परिषदेत एक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून मला भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दबाव आणला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. आतिशी म्हणाल्या की, पुढच्या काही दिवसांमध्ये आपच्या आणखी काही नेत्यांना अटक केली जाईल. पंतप्रधान मोदी आणि भाजपने आप नेत्यांना संपवण्याचा निश्चय केला आहे. आपचे वरिष्ठ नेते अटकेत आहेत, परंतु रविवारी रामलीला मैदानावर लाखो आले आणि रस्त्यावर उतरुन भाजपचा निषेध केला. त्यावरुन पुढच्या काही दिवसांत आपचे नेते अटक होतील, असं दिसून येतंय.
आम आदमी पक्षाच्या चार मोठ्या नेत्यांना जेलमध्ये(maxwell leadership) टाकलं जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या खासगी निवासस्थानी ईडीची रेड होईल. माझं कुटुंब आणि नातेवाईकांच्या घरी छापा पडू शकतो. आमच्या सगळ्यांना समन्स पाठवलं जाईल आणि पुन्हा अटक केली जाईल, अशी शंका आतिशी यांनी बोलून दाखवली.
आतिशी यांनी पुढे सांगितलं की, येणाऱ्या दोन महिन्यात, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या चार नेत्यांना अटक करण्याचं नियोजन केलं जात आहे. माझ्यासह सौरभ भारद्वाज यांना अटक होऊ शकते. तसेच दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
”मी आज भारतीय जनता पक्षाला हे सांगू इच्छिते की, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाहीत. आम्हीसुद्धा भगत सिंगांचे चेले आहोत, केजरीवाल यांचे शिपाई आहोत. जोपर्यंत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटचा श्वास शिल्लक आहे, तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात देश वाचवण्याचं काम करत राहणार आहोत. तुम्ही प्रत्येक आमदाराला जेलमध्ये टाका, त्याच्या जागेवर आणखी १० जण लढण्यासाठी सज्ज होतील.” असा इशारा आतिशी यांनी दिला.
हेही वाचा :
शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री
आठ वर्ष पत्नीने स्पर्श करु दिला नाही…आता प्रसिद्ध कलाकार भाजपकडून निवडणूक मैदानात
प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या