प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

नवी दिल्ली : इंजिनिअरिंग(qa engineer) कॉलेजच्या प्राध्यापकांनी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याची आणि त्यामुळं तिनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीनं आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोटही लिहिली असून त्यात तिनं आपला लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथल्या चैतन्य इंजिनिअरिंग(qa engineer) कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी पीडित विद्यार्थीनी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत होता. या विद्यार्थ्यीनीनं आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये तिनं आपला लैंगिक छळ होत असल्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर सर्वात धक्कादायक म्हणजे आपल्यावरील या लैंगिक छळामध्ये कॉलेजच्या प्राध्यापकांचाही समावेश असल्याचं तिनं म्हटलं आहे.

पीडित विद्यार्थ्याच्या भावानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “माझ्या बहिणीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, तिला केवळ विद्यार्थ्यांकडून त्रास होत नव्हता तर त्यात प्राध्यपकांकडूनही त्रास दिला जात होता. माझी तक्रार कोणीही ऐकून घेण्यास तयार नाही. लैंगिक छळामुळं मी वर्गातही जाऊ शकत नाही की हॉस्टेललाही राहू शकत नाही. मी खूपच निराश झाल्यामुळं हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या भावाच्या शरिरावर कुठल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळं हा एक गंभीर विषय आहे”.

पोलिसांशी आम्ही संपर्क साधला असून एक दिवस रविवारची सुट्टी आणि एक दिवस कार्यक्रमात व्यस्त असल्याचं सांगत पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण आम्ही योग्य ती पावलं उचलू असं सांगितलं आहे. पोलिसांनी होस्टेलचे सीसीटीव्ही देखील तपासले आहेत. पण तिच्या मृत्यूपूर्वी चार चास आधी काय झालं याचं सीसीटीव्ही त्यांनी पाहिलेलं नाही, असा आरोप पीडित मुलीच्या भावानं केली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू; अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या

शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री

आठ वर्ष पत्नीने स्पर्श करु दिला नाही…आता प्रसिद्ध कलाकार भाजपकडून निवडणूक मैदानात