कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार यांचे आज पर्यंतचे राजकारण(companion care), भल्या भल्या नेत्यांना, राजकीय विश्लेषकांना नेमकेपणाने समजलेले नाही, कळालेले नाही. ते बोलतात एक, आणि करतात दुसरेच. पोटात एक आणि ओठावर दुसरेच. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी त्यांनी नजीकच्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकीत करून खळबळ उडवून दिली आहे.
लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेसचे गांधीवादी विचार आम्हाला पटतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची विचारधारा एकच आहे. सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून मी यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा नजीकच्या(companion care) काळात काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्यांना या देशातील प्रादेशिक पक्ष म्हणावयाचे आहेत की महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष म्हणावयाचे आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विचार आमच्याशी जुळतात असे सांगून त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी संभ्रमी वातावरण तयार केले आहे.
शरद पवार यांनी त्यांचा राष्ट्रवादी गट काँग्रेसमध्ये विलीन केला तर फारसे आश्चर्य वाटणार नाही. कारण त्यांनी यापूर्वी काँग्रेसशी फारकत घेऊन शरद काँग्रेस, समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि नंतर ती पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना केली. हा पक्ष रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाच त्यामध्ये उभी फूट पडली. एक मोठा गट सोबत घेऊन अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला. आता उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेस अंतर्गत दबाव गट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या पण राजकीय स्थिती त्रिशंकू अशी होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा कौल दिलेला आहे असे सांगत शरद पवार फिरत होते. मात्र त्यांनी अवघ्या काही दिवसात सत्ताच हस्तगत केली महा विकास आघाडीच्या माध्यमातून. त्याच्याही आधी त्यांनी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला बाहेरून बिनशर्थ पाठिंबा देऊन सर्वांनाच चकित करून टाकले होते.
देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचे समर्थन होते, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असे खुलासे करून शरद पवार यांच्या विश्वासार्ह राजकारणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
शरद पवार यांनी”लोक माझे सांगाती”या आत्मकथनपर पुस्तकात बरेच राजकीय धक्कादायक खुलासे केलेले आहेत. त्यातून त्यांचे अनाकलनीय राजकारणच पुढे येते.
लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकीत केल्यानंतर खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्यांचे एकेकाळचे सहकारी छगन भुजबळ यांनी तसे काही घडेल असे मला वाटत नाही पण शरद पवार यांच्याशी अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे संबंध असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षही करता येत नाही असे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील असे शरद पवार यांनी म्हटलेले नाही. त्यांनी अनेक पक्ष असा शब्द वापरलेला आहे म्हणजे सगळे पक्ष असा त्याचा अर्थ होत नाही अशी सारवासारव सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या भाकिताचे स्वागत केले आहे. काँग्रेस पुन्हा एकदा ताकतीने सत्तेत येईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे. अरे भारतीय जनता पक्षाचे एक नेते चंद्रकांत पाटील यांनी”आम्हाला राजकारणातून शरद पवार यांना संपवायचे आहे”अशी टोकाची टिपणी केली आहे.
राजकारणातून कोणताही नेता संपत नसतो. त्याचा प्रभाव कमी जास्त होऊ शकतो इतके सामान्य राजकारण चंद्रकांत पाटील यांना माहीत नसावे याचेच आश्चर्य वाटते. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवार गट यांना आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिक आहे. पण त्यांनाही वेट अँड वॉच या अवस्थेत शरद पवार यांनी आणले आहे. एकूणच शरद पवार यांचे राजकारण त्यांच्या सहकाऱ्यांनाच काय, त्यांच्या कुटुंबीयांनाही समजलेले नाही. महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषकांनाही हा राजकारणी सापडलेला नाही असे म्हणावे लागेल.
हेही वाचा :
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन
महागाईचा भडका! तुरीच्या डाळीत 30 टक्के तर उडदाच्या डाळीत 15 टक्क्यांची वाढ