उद्योजकांकडून चिंता; वीजदरवाढीचा ‘उद्योग’ उत्पादनांच्या मुळावर

समस्यांच्या गर्तेत असलेल्या सूक्ष्म व लघुउद्योजकांच्या(in short) अडचणीत वीजदरवाढीची पडली भर.

पुणे – समस्यांच्या गर्तेत असलेल्या सूक्ष्म व लघुउद्योजकांच्या अडचणीत वीजदरवाढीची भर पडली आहे. उद्योगाला बूस्टर मिळण्याची अपेक्षा असताना दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. (in short)विजेचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असून थेट नफ्यावर परिणाम होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्यात ऑटोमोबाइल क्षेत्र वाढले आहे. या क्षेत्राला आवश्यक असलेली विविध उत्पादने तयार करणाऱ्या अनेक सूक्ष्म व लघू आकाराच्या कंपन्या पुण्यात आहेत. यासह शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना दरवाढीचा परिणाम सहन करावा लागणार आहे.

उद्योग क्षेत्र

प्रकार – सेवा क्षेत्र – उत्पादन क्षेत्र

सूक्ष्म – १,३३,७०८ – ६५,०००

लघु – २२,३९९ – ११,६७६

मध्यम – ७६२ – ७३६

मोठे – ८३२ – ०

एकूण – २,३५,११३ – (२२०० आयटी कंपन्यांसह)

एकूण रोजगार – १६,००,००० – (आयटी रोजगार ४ लाखांसह)

उद्योगांत सीएनडी, वेल्डिंगसाठी वीज मोठ्या प्रमाणात लागते. अनेक कंपन्यांत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम चालते. परंतु आता विजेचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या प्रमाणात मोठ्या कंपन्या लघुउद्योगांना उत्पादनांचे दर वाढवून देत नाहीत. त्यामुळे लघुउद्योगांची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यात ग्रामीण भागात लोडशेडिंग आहे.

  • अशोक भगत, लघुउद्योजक

उद्योग क्षेत्रात वाढलेला खर्च उद्योजक स्वतः सहन करू शकत नाही. ज्याप्रमाणे उत्पादन खर्च वाढेल, त्याप्रमाणे उद्योजक उत्पादनांची किंमत वाढवतो. त्यामुळे ग्राहकांना मिळणारी वस्तू आता महाग होणार आहे. ही दरवाढीची झळ उद्योग क्षेत्रासह ग्राहकांनाही सोसावी लागणार आहे.

  • डॉ. रवी जोशी, लघुउद्योजक

हेही वाचा :

ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

संगीत सिरेमनीमध्ये तापसी पन्नूने मॅथियास बोसोबत केला रोमँटिक डान्स

‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’