शक्‍तिप्रदर्शन ; विदर्भातून राणा, पाटील,आंबेडकरांनी भरला अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार (candidate search)दुसऱ्या टप्प्यासाठी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार (candidate search)नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्रप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर राणा यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची सभा पार पडली. यवतमाळ मतदारसंघातील ‘महायुती’च्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. येथूनच बहुजन समाज पक्षाकडून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला.

मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडली

मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली मतदारसंघातून बाबूराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यानंतर शिंदे यांची सभाही पार पडली. नांदेडला प्रताप पाटील चिखलीकरांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने परभणीतील उमेदवार अचानक बदलला असून येथून आता पंजाब डख यांना संधी देण्यात आली आहे.

आंबेडकरांची मनधरणी सुरू

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे म्हणून काँग्रेसकडून अद्याप प्रयत्न सुरूच आहेत. आंबेडकर यांनी जागांबाबत माझ्याकडे प्रस्ताव सादर करावा मी तो पश्रश्रेष्ठींकडे देईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे. ‘वंचित’ने या मतदारसंघातून जाहीर केलेल्या उमेदवारास उमेदवारी अर्ज दाखल करू नये अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिल्या आहेत. यासोबतच आनंदराज आंबेडकर यांनाही अर्ज मागे न घेण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :

“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले

हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं

‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’