पाण्यासाठी दाही दिशा…; दुष्काळात राज्यातील नागरिकांची होरपळ

राज्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच दुष्काळाचा पाणीपुरवठा(Water supply) दाहही वाढतो आहे.मराठवाडा – धरणे आटली, पाणीसाठा घटला, टॅंकर वाढले.

मुंबई – राज्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच दुष्काळाचा दाहही वाढतो आहे. राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून, अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाईचा(Water supply) सामना करावा लागत आहे. धरणे, तलाव आटल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी ‘दाही दिशा’ वणवण करण्याची वेळ आली आहे.

मराठवाडा – धरणे आटली, पाणीसाठा घटला, टॅंकर वाढले

गेल्यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मराठवाडा विभागातील दहा तालुक्यांसह १८० महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर अनेक महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अजून कडकडीत उन्हाचे दोन महिने आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत तर २६ मध्यम प्रकल्पातील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे. ७५० लघु प्रकल्पांपैकी १०८ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर २८२ लघु प्रकल्पांचे पाणी जोत्याच्या खाली गेले आहे.

विदर्भ – काही भागांत टंचाईच्या झळा

मार्च महिन्यापासून तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे परिणाम विदर्भातील नदी, नाले, धरणांतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. विदर्भात अद्याप तरी तीव्र दुष्काळ जाणवत नसला तरी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः वर्धा, चंद्रपूर, अमरावती,भंडारा या जिल्ह्यांतील काही भागांत दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत.

वर्धा जिल्ह्यात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात १५९ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, याची दखल घेत कोट्यवधी रुपये खर्च करून २९४ उपाययोजना राबविण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नदी, नाले, धरणांतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात ११ मध्यम प्रकल्पांत सध्या २६.४९ टक्केच जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमी पेक्षा कमी झाले आहे, अशा महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील १३४ गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. यात भंडारा तालुक्यातील २५ गावे, साकोली २६, लाखनी १४, मोहाडी २०, तुमसर २६, पवनी १४, लाखांदूर ९ अशा तालुकानिहाय गावांचा समावेश आहे.

हेही वाचा :

ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

संगीत सिरेमनीमध्ये तापसी पन्नूने मॅथियास बोसोबत केला रोमँटिक डान्स

‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’