पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

काँग्रेस नेते(political news today) मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तान संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते सॅम पिट्रोदानंतर आता मणिशंकर अय्यर यांनी एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. त्यामुळं त्यांना सन्मान दिला पाहिजे, असं काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर एका मुलाखतीत म्हटले आहे.

पाकिस्तानला आपण सन्मान दिला पाहिजे(political news today). जर सन्मान दिला नाही तर ते बॉम्ब फोडतील. पाकिस्तान सोबत चर्चा करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील १० वर्षांपासून हे सगळं बंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मणिशंकर अय्यर यांचं पाकिस्तान संदर्भातील विधान जोरदार व्हायरल होत आहे. ते म्हणत आहेत की, भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे कारण त्याच्याकडे अणुबॉम्ब आहे. जर पाकिस्तानचा आदर केला नाही, तर ते भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करू शकतात.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानशी चर्चेबाबत वक्तव्य करताना अणुबॉम्ब असल्यामुळे भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असं म्हटलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आता समोर येत आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

अय्यर म्हणाले आहेत की, पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, हे भारताने विसरता कामा नये. पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे म्हणून चर्चा करणार नाही, असं सध्याचे सरकार म्हणत आहे. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. संवादातूनच दहशतवाद संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

हेही वाचा :

निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा…

‘तू कसा आमदार होतो तेच बघतो’, अजित दादांचे थेट आव्हान

नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका