सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे(rebel) गटाला सुटली. त्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान विशाल पाटलांना अर्ज मागे घेण्यासाठी आज (दि.22) शेवटची तारिख होती. मात्र, आजही त्यांनी अर्ज मागे घेतलेल नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष विशाल पाटलांवर कारवाई करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील(rebel) यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर कारवाई करणार आहोत. कोणीतरी त्यांना फूस लावत आहे. 25 तारखेला आमची मिटींग आहे, त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मतविभाजन करणारी कंपनी होती, तिचे आता काम संपलेलं आहे. लोकांना त्यांच्याबद्दल समजलेलं आहे. लोकांनी आता मतविभानज करायचं नाही. सेक्युलर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहणार आहेत. त्याचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील.
विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला शिट्टी हे चिन्ह मिळालय. दरम्यान, विशाल पाटलांना चिन्ह मिळाल्यानंतर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर चोरदार टीका केली. आमची लढाई दंडूकशाही करणाऱ्या संजयकाका पाटील यांच्या विरोधात असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. माझी लढाई स्वार्थासाठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारांचा खासदार सांगलीमध्ये निवडून येईल, असंही विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
सांगलीत ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. मात्र, विशाल पाटलांनी सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटूनही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो? हे पाहाणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. काँगेस पक्षाच्या विचाराचा खासदार लोक लिफापा चिन्हावर निवडून देतील, असंही विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटलांवर ‘मविआ’कडून दबावतंत्राचा वापरही करण्यात येत होता. मात्र, विशाल पाटलांनी माघार घेतलेली नाही.
हेही वाचा :
‘आपले’ मतदार गेले कुणीकडे? भाजपचं टेन्शन वाढलं
1 मे पासून ‘हे’ नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
मोठी बातमी! ‘हा’ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!