पराभवाची खात्री झाल्याने भाजपने मतदान यंत्रणा बिघडवल

भाजपला त्यांच्या पराभवाची खात्री झाल्यामुळेच त्यांनी मतदान यंत्रणा बिघडवली असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल तिथेच कासवगतीने यंत्रणा चालू होती आणि भाजपच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षांचा टक्का (percent)वाढू शकतो तिथे कोणत्याही अडचणीशिवाय मतदान घडवण्यात आले, असा थेट आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी आज संथगतीने झालेल्या मतदान प्रक्रियेवर टीका केली. मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रटेजी राबवली का अशी शंका वाटावी असे चित्र सोमवारी पाहायला मिळाले, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी जागरूक होती म्हणून भाजपला ईव्हीएम हॅक करता आले नाहीत. पैसेवाटपही आम्ही पकडले. त्यामुळेच त्यांनी यंत्रणा ढिली करून चार-चार तास लोकांना रांगेत उभे केले. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. पहाट झाली तरी चालेल, पण रांग सोडू नका असे आवाहन शिवसेनेने केल्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 11 पर्यंत मतदान होऊ शकले, असे संजय राऊत म्हणाले.(percent)
मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करणे हा लोकशाही आणि निवडणुकीचा अपमान आहे असे सांगतानाच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांत अशा पद्धतीने यंत्रणा बिघडवण्यात आली. भाजपा आणि मित्रपक्षांचा सर्व ठिकाणी पराभव होणार याची खात्री झाल्यानेच हा शेवटचा डाव टाकण्यात आला. तरीही इंडिया आघाडीच जिंकणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यंत्रणा भ्रष्ट करण्यात भाजपा, मिंधे, अजित पवार माहीर

निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन यंत्रणा भ्रष्ट करण्यात भाजपा, मिंधे गट आणि अजित पवार गट माहीर आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मशालीला मतदान होण्याची शक्यता होती तिथं यंत्रणा बिघडवण्यात आली, असे सांगत संजय राऊत यांनी मुंब्रा येथे घडलेल्या प्रकाराचा दाखलाही दिला. मुंब्य्रात एका तासात केवळ अकराच मतदारांनी मतदान टाकले, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?