देश राहुल गांधींकडे गांभीर्याने पाहतो, फक्त मोदीच त्यांची टिंगल करतात!

काँग्रेस नेते(congress) राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत आणि देशातील बहुसंख्य लोक एक नेता म्हणून त्यांच्याकडे गांभीर्याने पाहतात, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यांची टिंगलटवाळी करतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला.

शरद पवार यांनी एका यूटय़ूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राहुल गांधी यांची प्रशंसा केली. राहुल गांधी यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बराच बदलला आहे असे ते म्हणाले. 2019 नंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातूनच ते राजकारणाबाबत गंभीर असल्याचे दिसले. तत्पूर्वी त्यांच्या नेतृत्वाबाबत चर्चा व्हायची, असे पवार म्हणाले. राहुल गांधी यांच्याकडे लगेचच नेतृत्व जाईल असे नाही, पण एकत्रितरित्या चांगले काम होऊ शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.(congress)
महाराष्ट्रातील भाजपच्या जागा कमी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जागा वाढतील असा दावाही शरद पवार यांनी केला. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला मिळून केवळ पाच जागा मिळाल्या होत्या, असे ते म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरयाणा, पंजाब आणि दिल्लीमध्येही या वेळी काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा दिसून येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही स्थिर सरकार देऊ

महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणुकीबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले. यंदाच्या निवडणुकीत भाजपला मागच्या दोन निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील असे सूतोवाच करताना, भाजपला बहुमत मिळाले नाही तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून इंडिया आघाडी स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करेल, असे शरद पवार म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. राजकारणाबाबत ते गंभीर असल्याचे त्यातून दिसले.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?