रीलसाठी तरुणांकडून जीवघेणा स्टंट; Viral व्हिडिओ पाहून बसेल धक्का

विद्येचे माहेर हा शब्द कानावर पडताच आपल्याला आपसुक पुण्याचे नाव आठवते.(viral) मात्र विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या अनेक महिन्यापांसून थरारक घटना समारे येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या तरुणी धावत्या बाईकवर बसून धोकादायक स्टंट करत होती. पंरतू ही घटना ताजी घटना असतानाच पुन्हा एकदा पुण्याच्या स्वामीनारायण मंदिराजवळ काही तरुणांचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. रील्स काढण्यासाठी एका उंच वास्तुवर चढून जीवघेणा स्टंट करत होते. सध्या सोशल मीडियावरील या व्हिडिओची सर्वत्र मोठी चर्चा होतेय.

तरुणांपासून ते सध्या मोठ्यापर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे भयानक(viral) वेड लागलेले आहे. मात्र हे वेड तरुणांमध्ये अतिशय जास्त असलेले दिसते. याचा प्रत्यय आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओ पाहून आलेला असेल. काही वेळेत प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न तरुणाई करते. मात्र त्या पायी जीव जाईल याची त्यांना काही भिती नसते. मात्र सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून पुन्हा तरुणाई प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सिद्ध होते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुणे शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक उंच इमारत दिसून येतेय याच उंच इमारतीवर एक तरुणी एका तरुणाच्या हाताला धरुन खाली लटकत आहे. त्याच्या सोबत असलेला अजून एक तरुण या दोघांचा रिल्स व्हिडिओ बनवत आहेत. व्हिडिओ पाहून समजते की या तरुणीला खाली पडून मृत्यू होण्याची काहीही भिती वाटत नाही. शिवाय तिच्या सोबत असलेले दोन तरुणही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या सर्वांवर कठोर कारवाई करतील अशी नेटकऱ्यांची आशा आहे. रिल्स बनवण्याच्या नादात काही दिवसांपूर्वी संभाजी नगरमधील एक महिला कारमधून दरीत पडली होती. या सर्व घटना तरुण पाहत असूनही अशी स्टंटबाजी करण्याचा त्यांच्या हा प्रयत्न कशासाठी? असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडले आहे.

हेही वाचा :

वट पोर्णिमेला महिला व्रत का करतात? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त

 व्हॉट्सॲप वापरून बुक करता येणार मेट्रो तिकीट

 “जरांगेंचे समाधान होतच नाही…” सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन