इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या(pollution) पार्श्वभूमीवर शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी आणि हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वॉटर स्प्रिंकलर टँकरच्या साहाय्याने रस्त्यांची स्वच्छता व पाण्याची फवारणी करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

शहरातील वाढते धूळ प्रदूषण(pollution) आणि हवेच्या गुणवत्तेतील घसरण यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्याकडे निवेदन दिले. हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी जल फवारणी हा एक प्रभावी उपाय असून, या तंत्रज्ञानाचा वापर शहरातील मुख्य रस्त्यांवर नियमितपणे करण्यात यावा, असा आग्रह यावेळी व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वॉटर स्प्रिंकलर टँकरद्वारे फॉगिंग, पाणी फवारणी, रस्ते धुणे, डिव्हायडर स्वच्छ करणे आणि झाडांना पाणी पुरवणे यांसारख्या उपाययोजना केल्या जाव्यात. यामुळे शहरातील धूळ कमी होईल आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळेल. तसेच, ही यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमनसाठीही उपयुक्त ठरू शकते.

यावेळी उपायुक्त पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, हा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. या निवेदनप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस मनोज तराळ, उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, तसेच मोहन कुंभार, आदित्य पाटील, प्रवीण बनसोडे, राहुल गागडे, विष्णू पाखरे, हर्षवर्धन गोरे, प्रदीप कांबळे, अमित माछरे, आदित्य बनसोडे, विशाल शिरगावे, श्रेयश गट्टनी, रोहन कुंभार यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

इचलकरंजीत सम-विषम पार्किंगबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन

तुम्हालाही अन्न पचवण्यास त्रास होतो का करा ही योगासनं औषधांशिवाय मिळवा आराम

डोक्यावर कर्जाचा डोंगर, उसनवारीच्या पैशांचा तगादा, बायको अन् पोटच्या लेकानं केली बापाची हत्या; सांगली हादरलं