असं म्हणतात की, हसल्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. पण आजकालच्या कामाच्या व्यापामुळे(crying) अनेकांचं हसणं कमी झालेले आहे. अनेक लोकं रोज सकाळी हसण्याचे व्यायाम करताना दिसतात. हसल्यामुळे आपल्याला सकारात्मकता मिळते. पण जर जास्त हसलं तर, एखाद्या व्यक्तीला आजार होऊ शकतो, असं तुम्हाला सांगितलं तर ? पण हे खरोखर घडलेलं आहे. प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटातून देवसेना म्हणून प्रसिद्ध झालेल्या अनुष्का शेट्टीला हसण्याबद्दलचा एक आजार झालेला आहे. तिने याविषयीची माहिती एका मुलाखतीमध्ये दिली आहे.
एका जुन्या मुलाखतीमध्ये अनुष्का शेट्टीने सांगितले की, तिला हसण्याच्या दुर्मिळ(crying)आजार झालेला आहे. एकदा का ती हसायला लागली की, ती तिचं हसु थांबवू शकत नाही. तिने मुलाखतीमध्ये सांगितलं की, “मला हसण्याचा आजार झालेला आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्यासाठी हसणं ही एक समस्या आहे. जर मी एकदा हसायला लागले की, १५ ते २० मिनिटं माझं हसू आवरू शकत नाही. त्यामुळे मला शुटिंगवेळी खूप अडचण येते. त्यासोबतच मला कॉमेडी सीन बघतानाही अनेकदा हसू आवरता येत नाही. अनेकदा आम्हाला या कारणामुळे शुटिंगही थांबवावी लागलेली आहे. “
खरंच हसणे हा एक आजार आहे का? त्या आजारामागील नेमकी कारणं कोणती? याबद्दलची मुलाखत न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, “हसण्याबद्दलच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘स्युडोबुलबार अफेक्ट’ असं म्हणतात. अचानक हसणे किंवा रडणे, जास्तवेळ हसणं असे लक्षणं या आजाराचे आहेत. मोटर न्यूरॉन डिसीज (MND), अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS), मल्टिपल स्क्लेरोसिस (MS), ब्रेन स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूला झालेली दुखापत इत्यादी प्रकारच्या मेंदूच्या आजारांमुळे ‘स्युडोबुलबार अफेक्ट’ आजार होण्याची शक्यता असते.”
डॉ. कुमार सांगतात, “हसण्याचा आजार हा मानसिक आजाराचा भाग असू शकतो; पण ते तसं नाही. या आजाराचे लक्षणं भावनिक दिसू शकतात. मेंदू व्यवस्थित कार्य करत नसल्यामुळे हा आजार दिसू शकतो. त्यामुळे हा न्यूरोसायकियाट्रिक आजार मानला जातो. या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही, त्यामुळे हा मानसिक आजार मानला जात नाही. “
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर्घ, आरामदायी आणि मंद श्वास घ्यावा, दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवावं, खांदा, मान आणि छातीच्या स्नायूंना आराम द्यावा. संबंधित आजारावर काही औषधोपचार आहेत. पण ती औषधे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.
हेही वाचा :
रक्तरंजित रविवार! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या
भरधाव टेम्पोने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, जागी झाला मृत्यू
महाराष्ट्र हादरलं! अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार