मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावरील(highway) मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींच्या निधीची मागणी केली. राज्यपालांच्या अभिभाषणातील या महामार्गावरील निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने मंदिरांचा विकास करावा, अशी मागणी केली.

सतेज पाटील म्हणाले की, सरकार विकासाच्या नावाखाली केवळ महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. महामार्गासाठी(highway) मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असूनही, टोलविषयक अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, टोल वसुलीवरून ८६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत, मात्र महामार्गावरील टोलमुळे वाहनधारकांना ३ हजार कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
तसेच, शक्तिपीठ मार्गावर असलेल्या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याचा सरकारचा हेतू असायला हवा. मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली तर यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.
या महामार्गामुळे प्रभावित होणाऱ्या २७ हजार शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न उपस्थित करत, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली. महामार्ग रद्द करण्याचा विचार सुरू असल्यास, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत असताना, राज्यपालांच्या अभिभाषणात यावर कोणतीही चर्चा न झाल्याने सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सरकारला आवाहन केले की, मंदिरांचा विकास आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा.
हेही वाचा :
राम गोपाल वर्मा यांना अटक होण्याची शक्यता!
IPL सुरु होण्यापूर्वी मुकेश अंबानी घेणार मोठा निर्णय
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले