बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण(political isuee) तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यामध्ये हत्या करण्यात आली. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यानंतर संतोष देशमुख यांचे अत्याचाराचे फोटो व्हायरल झाले. यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांना बीड हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात(political isuee) एकच खळबळ उडाली. यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांवर आरोप करण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची देखील विरोधकांनी केली आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकत्व देखील नाकारले गेले होते. धनंजय मुंडे यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार देखील आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे आला आहे. तसेच बीडचे पालकमंत्री देखील अजित पवार आहेत. यामध्ये आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी बीड हत्या प्रकरणाच्या आरोपींबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी धनंजय मुंडेंवरील कारवाईबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संतोष देशमुख प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात अद्याप धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं नाही. त्यामुळे कारवाई करणं योग्य नाही, असं वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत महायुतीने कठोर भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख हत्येच्या तपासात धनंजय मुंडेंचा थोडाही सहभाग आढळून आला तर कारवाई केली जाईल, असं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणीचा विरोधकांचा जोर वाढला असताना महायुतीच्या नेत्याने हे वक्तव्य केले आहे. यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संजय शिरसाट यांनी कृष्णा आंधळे याच्या असण्यावर देखील संशय घेतला आहे. बीड हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे असे या आरोपीचे नाव असून पोलिसांकडून त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. संजय शिरसाट यांनी देखील कृष्णा आंधळे याच्या जीवंत असण्यावर देखील शंका उपस्थित केली आहे. त्याचा खून झाला असल्याची शक्यता असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
हेही वाचा :
विराट मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करतानाच अनुष्काला लागली झोप Video Viral
नग्न करुन तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी भाजप आमदारचा कार्यकर्ता Video Viral
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार