ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो; धनुभाऊंचा फोटो दाखवत धसांचा नवा गौप्यस्फोट

सरपंच संतोष देशमुख (latest political news)यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे. आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. यावेळी सुरेश धस यांनी भरसभेत साठे नावाच्या व्यक्तीची एफआयआर दाखवली.

केवळ मराठ्याचा असल्यामुळं बेदम मारलं. ज्यानी मारलंय त्याच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत, तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केलं नाही अशी खदखद देखील सुरेश धस यांनी बोलून दाखवली. इतकं भयान घडलं, तरी परळीचे पोलीस असं का वागतात, याचा सवाल पडत असल्याचं सुरेश धस म्हणालेत.

सात-सात गुन्ह्यातील आरोपी अटक होत नाही. याठिकाणी आकांनी महासंस्कृती कार्यक्रम घेतला. सगळा मिळून खर्च दहा लाख झाला. सरकारच्या तिजोरीतून मात्र पाच कोटी घेतले. पाच दिवस महोत्सव चालला. पाच कोटी रूपये खाल्ले. दहा लाख डालो पाच कोटी मिळवो, अशी टीका धसांनी केलंय.

मुंबईच्या(latest political news) एका एजन्सीला काम मिळालं होतं, त्याच्याकडून काढून परभणीतील मिनाज फारूकीला दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. यावेळी त्यांनी मिनाज फारूकीचा फोटो देखील दाखवला. ज्यामध्ये वाल्मिक कराड आणि मिनाज फारूकी दिसत आहेत. चार कोटी 90 लाख रूपये जेब में, त्यामुळे वाल्मिक अण्णाला इडीची नोटीस नाही येईल, तर काय होईल असा सवाल देखील त्यांनी केलाय.

दिव्य मराठी पेपरची आठ महिन्यापूर्वीची बातमी सुरेश धस यांनी भरसभेत दाखवली. तीन दिवसांत 890 कोटीचे ड्रग्स जप्त अशी बातमी होती. ड्रग्स म्हणजे इंजेक्शन नाही, तर अंगाला टोचायचं. रात्रभर बांगो बांगो बांगो असल्या पद्धतीचं औषध आहे. आता दम मारो दम जुना झाल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात दीड वर्षापासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत. त्यांचा धनंजय मुंडेंबरोबर फोटो आहे. खरा आका, असं म्हणत सुरेश धस यांनी सभेत फोटो दाखवले. शिव्या, धमक्या देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.

पाकिस्तानमधील तस्करीसोबत यांचे फोटो आहेत. सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा आहेत. तरीही दादा म्हणतात की, दुरान्वये त्यांचा संबंध नाही अशी टीका धसांनी केलीय. ते म्हणाले की, तुम्ही आमचे जावई आहात. याला बाहेर काढा, म्हणजे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी धसांनी केलीय. नुसता वाल्मिक कराडला दोष देवू नका, त्याची बॅकसाईट कोण आहे ते तपासा असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत.

हेही वाचा :

प्रभासच्या लग्नाचे गुढ: ‘बाहुबली’चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?

दगाफटका केला तर सरकारचा कार्यक्रमच लावणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

भारताला अजून एक मोठा धक्का, बुमराहसह अजून एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर