धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला…

टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीत भारतीय संघाने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत(dancing) केले. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत पोहण्यासाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे. दरम्यान, या विजयानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक मजेशीर रिल शेअर केला आहे, ज्याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.

पंतने इंस्टाग्रामवर जे रिल शेअर केले आहे, ती एक मीम पोस्टआहे. हे रिल त्याने बनवलेले नसल्याचे(dancing) त्याने स्पष्ट केले असून ते त्याच्या इंस्टाग्राम फीडला आले होते, जे त्याने शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये दिसले की माजी कर्णधार एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा नाचत आहेत. या रिलला ‘बरसो रे’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे.

हे रिल शेअर करत पंतने कॅप्शनमध्ये विराट, रोहित आणि धोनी यांना प्रेमाने भैय्या म्हणत त्यांची माफीही मागितली आहे. पंतने लिहिले की ‘चांगला विजय. सॉरी सारे भैय्या लोकांना. पण हा शानदार व्हिडिओ मला पोस्ट करावाच लागला. ज्याने कोणी हे बनवलं त्याचे आभार, माझे पहिले स्क्रिन रेकॉर्डिंग.’ या रिलवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 50 धावांची नाबाद खेळी केली. तसेच विराट कोहली (37), ऋषभ पंत (36), शिवम दुबे (34) आणि रोहित शर्मा (23) यांनीही छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

बांगलादेशकडून तान्झिम हसन साकिब आणि रिषाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली. त्यानंतर 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 146 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तसेच तान्झिद हसनने 29, तर रिषाद हुसैनने 24 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्याने 1 विकेट घेतली.

हेही वाचा :

रक्तरंजित रविवार! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

महाराष्ट्र हादरलं! अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार

देवसेनाला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार, मध्येच रडता रडता हसतेय