पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात(Kolhapur) कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं.
मराठमोळ्या स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात(Kolhapur) जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कांस्य पदक पटकवल्यानंतर स्वप्नील म्हणाला की, मी ध्येयावर लक्ष्य ठेवून काम करत होतो, एवढ्या वर्षात जे फॉलो करत होतो, तेच इथे केलं. माझे काही की पॉईंट्स होते, त्यावरच काम केलं. मी क्रिकेटपटू एमएस धोनीचा खूप मोठा चाहता आहे. जसा तो फिल्डवर शांत राहतो, तेच मी धोनीकडून शिकलो, फिल्डवर शांत राहून काम करतो. रुटीन होतं तेच फॉलो केलं. हे पहिलं ऑलिम्पिक होतं, कांस्य जिंकलं, आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करेन, अशी प्रतिक्रिया स्वप्नील कुसाळेने दिली.
स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की, त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते.
भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने प्रथमच पदक जिंकले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले.
पहिली पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 9.6, 10.4, 10.3, 10.5, 10.0, एकूण: 50.8 गुण
दुसरी फेरी- 10.1, 9.9, 10.3, 10.5, 10.1, एकूण: 51.9 गुण
तिसरी फेरी- 9.7, 10.3, 10.8, 10.4, 10.0, एकूण: 51.6 गुण
दुसऱ्या पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 10.5, 10.6, 10.5, 10.6, 10.5, एकूण: 52.7 गुण
दुसरी फेरी- 10.8, 10.2, 10.5, 10.4, 10.3, एकूण: 52.2 गुण
तिसरी फेरी- 10.5, 10.4, 10.4, 10.2, 10.4, एकूण: 51.9 गुण
तिसऱ्या पोझिशनमधील गुणसंख्या-
पहिली फेरी- 9.5, 10.7, 10.3, 10.6, 10.0, एकूण: 51.1
दुसरी फेरी- 10.6, 10.3, 9.1, 10.1, 10.3, एकूण: 50.4 गुण
बाकीचे चार शॉट्स: 10.5, 9.4, 9.9, 10.0
हेही वाचा :
दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी…
कोल्हापूरचे लोक प्रतिनिधी विकासाचा विचार करणार कधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली