गणपती बाप्पाला आराध्य दैवत (god) मानले जाते हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पुजा केल्या श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. विशेष म्हणजे जून महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही साजरी होणार आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते.
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त
कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 25 जून रोजी पहाटे 1.23 वाजता सुरू होईल आणि रात्री 11.10 वाजता समाप्त होईल. पहाटे ते दुपारी 2 वाजून 32 वाजेपर्यंत श्रवण नक्षत्र आहे. या दिवशी ब्रह्म मूहूर्त पहाटे 4 वाजून 5 मिनिटे ते 4 वाजून 45 मिनिटापर्यंत असणार आहे. पुजेसाठी शुभमूहूर्त 11 वाजून 56 मिनिटे त दुपारी 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत असणार आहे. अंगारकी चतुर्थीला विधीवत पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते.
अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते
चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची (god) सर्वात आवडती तिथी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्य सर्व मनोकामना पूर्ण करतात. पुजा करताना लाल वस्त्र परिधान करावे. आवडते मोदक अर्पण करावा. अंगारकी चतुर्थीला चुकूनही तुळस तुळस अर्पण करु नये. अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी धारणा आहे. बाप्पा सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पुजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे, त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील.
चंद्रोदय वेळ
पंचांगानुसार 25 जून रोजी रात्री 10.05 वाजता चंद्रोदय होईल; यात मुंबई, ठाण्यात रात्री 10.28 ही चंद्रोदय वेळ आहे. रत्नागिरी, पुणे रात्री 10.23, सातारा 10.22 , यवतमाळमध्ये रात्री 10.28 अशी वेळ आहे. बीडमध्ये 10.16, सांगली 10.18. सावंतवाडी 10.20, सोलापूर 10.14, नागपूर 10.05, अमरावती 10.11 मिनिटे
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. चंद्रदर्शन आणि पूजा केल्यांतरच हे व्रत पूर्ण होते.
हेही वाचा :
25 जूनपासून जोरदार बरसणार, राज्यात यावर्षी जास्त पावसाचा अंदाज आहे
आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला
वेस्ट इंडिजचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न काही क्षणात भंगलं