उन्हाळा सुरु झाला की, शरीराला अधिक गारव्याची गरज असते. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ(iv for dehydration) खाल्ल्याने आपल्या पोटात आग किंवा जळजळ होते. अशावेळी आपण अनेक थंड पेयाचे सेवन करतो.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, डायरिया, टायफॉइड(iv for dehydration) यांसारख्या समस्या खूप सामान्य असल्या तरी त्यांचा शरीरावर खूप गंभीर आणि दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाका, सनस्क्रीन लावा, पुरेशा प्रमाणात पाणी प्या तसेच शरीर थंड ठेवा. उन्हाळ्यात गरम आणि थंड पदार्थांच्या सेवनाने ताप, सर्दी आणि खोकला होऊ शकतो. त्यासाठी आहारात लिंबूपाणी, शिकंजी सरबत, सत्तू, उसाचा रसचा समावेश करा. यामध्ये बडीशेपचे पाणीही शरीराला फायदेशीर ठरु शकते. याचा फायदा कसा होईल पाहूया.
-२ चमचे लिंबू, १/२ कप बडीशेप, ३ ते ४ पुदिन्याची पाने, चवीनुसार साखर, चवीनुसार काळे मीठ
-बडीशेपचा ज्यूस बनवण्यासाठी बडीशेप धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजवा
-त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. वरील सर्व साहित्य बारीक करुन त्याची पावडर तयार करा.
-ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात पेस्ट घाला वरुन लिंबाचा रस घाला.
बडीशेपचे फायदे
-बडीशेप शरीराला गारवा देते याचे पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते.
-यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या देखील टाळता येते.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
हेही वाचा :
आरबीआयच्या पतधोरणाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक; अपक्ष उमेदवार भाषणादरम्यान ढसाढसा रडला
महाराष्ट्रात आज १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?