वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने(blue mountain) माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांचा कस लागणार आहे. या मतदारसंघातील ‘वंचित’च्या उमेदवारीने शेट्टी यांची कोंडी झाली आहे; तर सरुडकरांच्या उमेदवारीने निवडणुकीतच रंगत आली आहे.

महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शेट्टी(blue mountain) यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ठाकरे गटाकडून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ दिली. त्याला शेट्टी यांचा विरोध होता. त्यात उद्धव ठाकरेंनी सरुडकरांची थेट उमेदवारीच जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचाही भ्रमनिरास झाला आहे.

लोकसभेची निवडणूक हे महाविकास आघाडीबरोबर असतील, असे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात होते. शेट्टींनीही पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंसह अन्य नेत्यांची भेट घेतली. पण, ‘मशाल’ चिन्हावर लढा असाच आग्रह ठाकरेंचा होता. ‘मशाल’वर लढल्यास ‘स्वाभिमानी’चं काय करायचे? पुन्हा पक्षीय बंधने नकोत या मानसिकतेतून शेट्टी आघाडीपासून दुरावत गेले आणि शेवटी या मतदारसंघात ठाकरे गटाच्या रूपाने चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

2019 च्या निवडणुकीत माने विरुद्ध शेट्टी, अशी दुरंगी लढत झाली. पर्याय नसल्याने मानेंच्या मागे भाजपची ताकद उभी राहिली. मराठा कार्ड, तरुण उमेदवार, भाषण कौशल्य आणि महायुतीची ताकद या जोरावर माने विजयी झाले. पण, आता इचलकरंजीतून भाजपबरोबर असलेल्या आवाडे गटानेच मानेंच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे. यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर विधानसभेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते वगळता अन्य कोणी मानेंसाठी झटताना दिसत नाही. त्यातून पाच वर्षांतील कामांमुळे मानेंविषयी नाराजी होतीच, ती आता उघडपणे व्यक्त होत आहे.

ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह घराघरांत पोहाेचवणे महत्त्‍वाचे आहे. त्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यातून सरुडकरांना रिंगणात उतरले आहे. गेल्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टींना अवघे सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते, यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते. ऊसदरावरून शेट्टींविरोधात कारखानदार आहेत. सरुडकर हे थेट कारखानदार नाहीत. त्यामुळे कारखानदार शेट्टींचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी सरुडकर यांना साथ देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

हार्दिकनंतर कर्णधार कोण? रोहित शर्मा नव्हे तर ‘या’ खेळाडूकडे सोपवणार धुरा?

शिंदेंच्या शिवसेनेवर कमळाबाईचा कंट्रोल; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; ‘या’ कंपनीने आणली नवी पॉलिसी