कोल्हापुरात फुटबॉल सामन्यावेळी दोन गटात राडा

कोल्हापूर प्रतिनिधी : हाणामारीनंतर फुटबॉल सामना स्थगित. पाटाकडील(football fixtures) तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल सामन्यावेळी खेळाडूंमध्ये मैदानात फ्रीस्टाइलने हाणामारी झाली. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्थी करून खेळाडूंमधील हा वाद मिटवला. मात्र तणावाचे वातावरण पाहून हा सामना स्थगित करण्यात आला. मात्र मैदानातून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंमध्ये पुन्हा वादाला ठिणगी पडली. वादावादी हाणामारी झाली या प्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना(football fixtures) रविवारी पी टीएम व पारंपारिक प्रतिस्पर्धी श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात खेळवला जात होता. हाय व्होल्टेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये मैदानात असतानाच हाणामारी झाली, मात्र पोलीस आणि संयोजक समितीने हा वाद मिटवला. दरम्यान माती तसेच वाळूने भरलेल्या बाटल्या समर्थकांकडून मैदानात फेकण्यात येत होत्या, तर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू व त्यांचे समर्थक एकमेकांना शिव्या देत होते ,काही काळाने दोन्ही संघांच्या असहकार्य भूमिका मुळे मैदानात तणावपूर्ण वातावरण होते.

दरम्यान सामना स्थगित करण्यात येत असल्याचे संयोजकांनी जाहीर केले. यावेळी मैदानात बाहेर जात असताना प्रतिस्पर्धी संघाचे समर्थक परस्परांना शिवीगाळ करत होते. मैदानाच्या बाहेरही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी ज्यादा कुमक बोलवून दोन्ही गटाच्या खेळाडू व समर्थकांना हाकलून लावले. यावेळी झालेल्या हाणामारीत अनेक जण किरकोळ जखमी झाले.

शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके ,जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे ,लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह 100 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त यावेळी बोलवण्यात आला होता. पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुदैवाने मैदानात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

हेही वाचा :

हळहळ: कोल्हापुरात फुटबॉल सामना पाहून घरी परतणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

प्राजक्ता माळीने नावात केला मोठा बदल; म्हणाली, ‘आयुष्यात वडिलांचं नाव..’

केजरीवालांच्या अटकेनंतरही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवलं; कोल्हापुरात सामूहिक उपोषण