हळहळ: कोल्हापुरात फुटबॉल सामना पाहून घरी परतणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी स्टेडियम येथील फुटबॉल(football match) सामना पाहून घरी परतणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सायंकाळी सहा वाजून सुमारास मंगळवार पेठ परिसरात घडलेल्या घटनेने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्माघातामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

मंगळवारपेठेत राहणारा रितेश किरण माळी (वय २४) याचा रविवारी सायंकाळी(football match) सहा वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उमद्या तरुणाचा अशा प्रकारे चटका लावणारा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात होती.

एका दुकानात काम करणारा रितेश माळी रविवारी दुपारी शिवाजी स्टेडीयम येथील फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता. प्रेक्षक गॅलरीत भर उन्हात बसावे लागल्यामुळे त्याला खूप त्रास झाला. उन आणि घामाच्या धारामुळे त्याचे शरीर भिजले होते. सामाना संपल्यानंतर त्याने मित्राच्या घरात जाऊन पाणी घेतले, त्यानंतर पीटीएम तालमीच्या दारात बाकड्यावर बसला होता.
तेथून घरी जात असताना अचानक छातीत कळ आली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला.

गल्लीतील तरुणांनी तातडीने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रितेश माळी याचा अचानक आणि चटका लावणारा मृत्यू झाल्यामुळे मंगळवारपेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. मित्र व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सीपीआर रुग्णालयात रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हेही वाचा :

प्राजक्ता माळीने नावात केला मोठा बदल; म्हणाली, ‘आयुष्यात वडिलांचं नाव..’

केजरीवालांच्या अटकेनंतरही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवलं; कोल्हापुरात सामूहिक उपोषण

गुढीपाडवा झाला गोड, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त