भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे(vegetables). काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरही झाला आहे.

सर्वसामान्यांना एकीकडे वाढत्या महागाईचा(vegetables) फटका बसत असताना आता त्यात मुसळधार पावसाचीही भर पडत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्यांची आवक कमी मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे. तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फुलकोबी याचे दर हे १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर कांदे आणि बटाटे ६० ते ७० रुपये पर्यंत आहे.

भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

विराट कोहलीच्या ‘One8 Commune पब’विरोधात FIR दाखल

आम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे? करण जौहरच्या मुलं जेव्हा असा प्रश्न विचारतात…

धक्कादायक घटना! हात अन् पाय पकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल