विराट कोहलीच्या ‘One8 Commune पब’विरोधात FIR दाखल

बेंगळुरूमधील एमजी रोडवर वन8 कम्युन पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा(fir) आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.कर्नाटकच्या बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीचे एक पबही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर एक 8 कम्युन पब आहे. हा पब(fir) विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दिलेली वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्याचा आरोप आहे.

बंगळुरूमधील कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कस्तुरबा रोडवर स्थित One8 Commune 6 जुलै रोजी रात्री 1.20 वाजता सुरु होता. यावेळी ग्रहाक देखील होते. रात्री गस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला One8 कम्युन पब रात्री उशिरापर्यंत उघडा असल्याचा फोन आला, उपनिरीक्षक पहाटे 1:20 वाजता पबमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की पब अजूनही ग्राहकांना सेवा देत आहे. त्यानंतर या पबवर कारवाई करण्यात आली.

विराट कोहलीची मीडिया रिपोर्ट्सनुसार एकूण संपत्ती 1 हजार 50 कोटी इतकी आहे. विराटलाही बीसीसीआयकडून A+ वार्षिक करारानुसार वेतन मिळतं. तसेच विराटला आयपीएलमधून 16 कोटींची कमाई होते. विराट जाहिरातीतूनही कमावतो. विराट मुंबई त्याची पत्नी अनुष्का शर्मा हीच्यासह बंगल्यात राहतो. त्या बंगल्याची किंमत 34 कोटी इतकी आहे. विराटची गुरुग्राम येथे संपत्ती आहे, त्याची किंमत जवळपास 100 कोटी इतकी आहे.

विराट कोहलीची खूप संपत्ती आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने अलीबागमध्ये नुकताच 10 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आता तो लंडनमध्ये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. अकायच्या जन्माआधीच ती लंडनमध्ये गेली होती. अकायचा जन्म लंडनमध्येच झाल्याचा दावा केला जात आहे. अकायच्या जन्मामुळे टीम इंडियातून ब्रेक घेऊन कोहली लंडनला गेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहे.

हेही वाचा :

आम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे? करण जौहरच्या मुलं जेव्हा असा प्रश्न विचारतात…

धक्कादायक घटना! हात अन् पाय पकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? सरकारची डोकेदुखी वाढली