ईसीबीचा बीसीसीआयला ठेंगा, इंग्लिश क्रिकेटपटू निघाले मायदेशी

इंग्लिश (english)क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी हिंदुस्थानात थांबावे, अशी विनंती बीसीसीआयने ईसीबीला केली होती. पण इंग्लंड क्रिकेट मंडळाने बीसीसीआयच्या आवाहनाला ठेंगा दाखवला असून त्यांच्या आदेशानंतर इंग्लिश क्रिकेटपटू जोस बटलर, फिल सॉल्ट, मोईन अली, सॅम करण, जॉनी बेअरस्टॉ, विल जॅक्स, रीस टॉपली, लियाम लिव्हिंगस्टोन हे मायदेशी रवाना झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आयपीएलच्या फ्रेंचायझीजना दिग्गज खेळाडूंच्या माघारीचा जबर फटका बसणार आहे.

येत्या 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला प्रारंभ होत असून आयपीएलचा अंतिम सामना 26 मेला रंगणार आहे. तसेच प्ले ऑफच्या लढती 21 ते 24 मेपर्यंत खेळल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे आयपीएलची शेवटची साखळी लढत खेळली जाणे शिल्लक असून चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनऊ, गुजरात, दिल्ली या सहा संघांपैकी दोन संघांना प्ले ऑफ गाठता येणार आहे. पण त्याआधीच जोस बटलर, फिल सॉल्ट, विल जॅक्स, लिएम लिव्हिंगस्टोन, रीस टॉपली हे फॉर्मात असलेले खेळाडू मायदेशी परतले आहेत. (english)त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या कोलकात्याला फिल सॉल्टची कमतरता नक्कीच जाणवेल. तिच स्थिती प्ले ऑफच्या उंबरठय़ावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचीदेखील झालीय. सॉल्ट आणि बटलरने सलामीला येऊन एकापेक्षा एक खेळय़ा करून आपल्या संघांना आघाडीवर नेले आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीचा या दोन्ही संघांना किती फटका बसतो ते प्ले ऑफमध्ये कळेलच.


इंग्लिश क्रिकेटर्संना आर्थिक दंड ठोठवा
ईसीबीचा आदेश मिळताच इंग्लिश क्रिकेटपटूंची मायदेशी परतण्याची लगबग सुरू झाली होती. आयपीएल फ्रेंचायझीजने खेळाडूंशी करार करताना ते पूर्ण आयपीएल खेळण्याचाही करार केला होता. यासाठी ईसीबीलाही प्रत्येक खेळाडूंच्या मूळ रकमेतील दहा टक्के हिस्सा दिला जात होता. त्यामुळे ईसीबीने आयपीएलशी केलेला करार पाळावा. जर ते आपले वचन मोडत असतील तर खेळाडू आणि ईसीबीचे मानधन आणि कमिशन कापावे, असा सल्ला बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझीजना सुनील गावसकर यांनी केला होता.

हेही वाचा :

कोल्हापूरात रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती

कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर…