केजरीवालांच्या निवडणूक प्रचार साठीजामीन अर्जाला ईडीचा विरोध

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. प्रचार सभा घेण्यासाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात यावे, या मागणीसाठी अर्ज करण्यात आलाय. दुसरीकडे ईडीने शपथपत्र दाखल केलं असून यात जामीन देऊ नये म्हटलंय.

निवडणूक प्रचार सभा घेणं हे मूलभूत अधिकार नाहीये. जर त्यांना जामीन दिलं जाईल तर ते योग्य राहणार नाही. जामीन देण्याचा निर्णय नवीन पायंडा तयार करणारा असेल, असं ईडीने न्यायालयात म्हटलंय.आतापर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला नाहीये. ईडीने प्रतिज्ञापत्रात गेल्या ५ वर्षांत झालेल्या १२३ निवडणुकांचा तपशील दिलाय. यामध्ये कोणत्याही नेत्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला नसल्याचं म्हटलंय.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला असून शुक्रवारी यावर निर्णय दिला जाणार आहे. ईडीने कथित दारू घोटळ्यात केजरीवाल यांना अटक केली असून आता केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी शुक्रवारी ट्रायल कोर्टात त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

‘या’ अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी

मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रंचड नाराज

ब्रेंकिंग! संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी