ईडीचं नो ऑब्जेक्शन! ‘आप’चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट(bail) हाती आली आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीत आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश (bail)संजीव खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश पीबी वराळे यांच्या खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी केली. ‘खासदार संजय सिंह यांना तरुंगात ठेवण्याची गरज काय? असा सवाल या तिन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने ईडीला केला. संजय सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं की, या मनी लॉड्रिंग प्रकरणाला दुजोरा मिळालेला नाही’.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि चौकशीला आव्हान देणारी याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ‘आप’ खासदार संजय सिंह यांच्या वकिलांच्या युक्तिवादावर विधान केलं. खासदार सिंह यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, संजय सिंह यांच्याकडून कोणाताही पैसा जप्त करण्यात आलेला नाही. त्यांच्यावरील दोन कोटी रुपये लाच घेण्याच्या आरोपांची चौकशी करता येईल’.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश पीबी वराळे यांच्या खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी केली. ‘खासदार संजय सिंह यांना तरुंगात ठेवण्याची गरज काय? असा सवाल या तिन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने ईडीला केला.

दरम्यान, संजय सिंह यांच्यावर २०२१-२२ पॉलिसी पीरियडशी संबंधित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील फंड जमा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने विरोध केला नाही.

सुप्रीम कोर्टाने निर्णयावर भाष्य करताना म्हटलं की, ‘संजय सिंह यांना राजकीय कामे सुरु ठेवता येईल’. तत्पूर्वी, ‘पीएमएलएच्या ३ आणि ४ कलामाअंतर्गत कारवाई अधिकवेळ सुरु राहणार असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर केला, असं ‘सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

हेही वाचा :

बिंदू चौक ते गांधी मैदान प्रचंड सभा ते विराट सभा

17 रुपयांची साडी…2 कोटींची गाडी…महायुतीत निवडणुकीच वातावरण तापलं

लोकल ट्रेनमध्ये १५ वर्षीय मुलीला किस करण्याचा प्रयत्न, वडिलांसह प्रवाशांनी…