“अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा”, विशाल पांडेचे आई-वडील संतापले

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये चांगलाच धमाका पाहायला मिळत आहे. (parents)टॅरो कार्ड रीडर मुनीषा खटवानीचा शोमधील प्रवास संपुष्टात आला आहे. नुकत्याच झालेल्या “विकेंड का वार”मध्ये अनिल कपूर स्पर्धकांवर चांगलाच बरसला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अरमान मलिक आणि विशाल पांडे प्रकरणावर अनिल कपूरने दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विशालच्या समर्थनार्थ अरमान मलिकला अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत. अशातच विशाल पांडेच्या आई-वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच त्यांनी ‘विरल भयानी’या इन्स्टा पेजसोबत बोलत (parents)असताना प्रतिक्रिया दिलेली आहे. विशालच्या आई-वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं, “बिग बॉस, प्लिज आमची एक मागणी आहे. ज्या माणसाने आमच्या मुलावर हात उगारला आहे, त्याला घरातून बाहेर काढा. आजवर आम्ही त्याच्या अंगावर केव्हाच हात उगारलेला नाही. त्याला आम्ही आजवर खूप प्रेमाने वाढवलं आहे. त्याच्या अंगावर बिग बॉसच्या घरात कोणी हात उगारेल, असा विचार करून आम्ही त्याला पाठवलं नव्हतं. ही घटना आमच्यासाठी खूपच वाईट आहे. त्याला मारलं आहे, हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाली आहे.”

या प्रकरणावर विशाल पांडेच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्या सर्वत्र विशालच्या पर्सनॅलिटीबद्दल खूप चर्चा सुरू आहे. त्याची पर्सनॅलिटी खोटी आहे असं बोललं जात आहे, पण तसं काहीही नाही. तो जसा आहे, तसा तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिसत असलेला त्याचा हा खोटा चेहरा नाही, जे आहे ते खरं आहे. त्यासोबतच कृतिका मलिक प्रकरणावर त्याच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. माझ्या मते, कोणाच्या सौंदर्याचे कौतुक करणं काही वाईट नाही. त्याने जे काही आहे, ते थेट बोलला आहे. माझ्या मुलाच्या कानाखाली मारल्यामुळे अरमान मलिकवर कारवाई व्हायला हवी. माझी बिग बॉस आणि निर्मात्याकडे विनंती आहे की, त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. त्याला घरातून बाहेर काढा.”

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरमान मलिक आपल्या दोन्ही बायकांसोबत ‘Bigg Boss OTT 3’च्या घरामध्ये सहभागी झाला आहे. विशाल पांडेने अरमानची दुसरी बायको कृतिका मलिक हिला “भाभी, तुम्ही विना मेकअप देखील खूप सुंदर दिसता.” अशी कमेंट केली होती. या कमेंटमुळे बिग बॉसच्या घरात खूपच वादंग निर्माण झाला होता. शनिवारी झालेल्या एपिसोडमध्ये अरमानने विशालच्या कानाखाली दिली होती.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित

झटपट नाश्त्यासाठी ‘मसाला मखाना’, ही आहे सोपी रेसिपी

Airtel चा जबरदस्त रिचार्ज, 28 दिवसांच्या प्लॅनवर फ्री मिळणार 3 महिने Disney+ Hotstar