एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश?; अधिकृत प्रतिक्रियाही दिली

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश(express entry) करण्यासाठी वेटिंगवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये ही भेट झाली. यावेळी रावेरच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झाल्याचे सूचक विधानही केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश(express entry) करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरत नव्हता. तसेच लोकसभेच्या रणधुमाळीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही भेटीसाठी वेळ दिला नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

अशातच काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये अमित शहा आणि खडसे कुटुंबियांची भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे.

“अमित शाह यांच्यासोबत औपचारिक चर्चा झाली. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे शाह यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असे म्हणत माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झालाय असे महत्वाचे विधानही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा खासदारकी मिळवल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रिय क्रिडामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

मोठी घडामोड; लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी गोंधळ आणि घोषणाबाजी

केजरीवालांना या अटींवर जामीन, आज होणार सुटका

शरद पवारच आता म्हणताहेत “महायुती”चं दुकान चालत नाही!