पदभार स्विकारताचं एकनाथ शिंदे अ‍ॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्शनमोडवर(politics) आले आहेत. कारण एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेतले आहेत. गृहनिर्माण विभागाकडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं, त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

याशिवाय पर्यावरणपूरक गृहनिर्माण(politics) धोरणाला चालाना देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारे रेंटल हाऊसिंग तसेच गिरणी कामगारांसाठी तब्बल 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट यासंदर्भात आज गृहनिर्माण विभागाकडून सादरीकरण केलं आहे. तसेच पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण देखील तयार होणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, गिरणी कामगारांसाठी तब्ब्ल 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट देखील ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यासाठी दोन निविदा देखील प्राप्त झाल्या आहेत. तसेच लवकरच त्याबाबतचा निर्णय देखील होणार आहे. याशिवाय जे गिरणी कामगार महाराष्ट्र मध्ये मुळ गावी स्थलांतरित झाले आहेत, त्यामुळे त्यांना तिथेच घरं देता येतील का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाला दिले आहेत.

दरम्यान आजच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या सादरीकरणामध्ये इंग्रजी स्लाइडचा वापर करण्यात आला आहे. मात्र यावर गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे, व मराठी स्लाईडबाबत विचारणा करण्यात आली आहे.

याशिवाय मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, हे लक्षात आहेत ना? अशी विचारणा देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा

एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा

चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान, हॉस्पिटल्स फुल्ल; 5 वर्षांनंतर भयावह स्थिती