प्रचार गीतातून ‘जय भवानी’, ‘हिंदू’ शब्द काढा.. निवडणूक आयोगाचे पत्र; उद्धव ठाकरेंचा दावा

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी(auto claim) सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

“निवडणुका आहेत. त्यासाठी एक प्रेरणा गीत(auto claim) लागते. म्हणून आम्ही आम्ही मशाल गीत काढलं आहे. यावर निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले. “हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म” यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेमधील ‘जय भवानी’ शब्द काढा,” असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आम्ही देखील रामभक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचं दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारचं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे,” असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे सांगितले.

त्याचबरोबर “अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचं उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावं, जर आमच्यावर कारवाई करायचं आहे तर यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल,” असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?

‘या’ नेत्याला शिंदेकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का; आता योग शिबिरासाठी सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार